मालेगाव निसर्गावर मानवी वस्त्यांचे अतिक्रमण चालले असून पूर्वी आपल्या आजूबाजूला असलेला घनदाट जंगल परिसर आजच्या माणसाच्या स्वार्थी व लोभी वृत्तीमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे निसर्गात मुक्तपणे वावरणारी जंगली प्राणी यांचे दिवसेंदिवस संख्या कमी होत असून जंगलाचा राजा म्हणून संबोधला जाणारा वाघ व चित्ता हा प्राणी पूर्णतः नामशेष होण्याच्या मार्गावर आहे या निसर्गातील प्राणी चक्रातील महत्त्वाचा भाग असणारा चित्ता हा प्राणी व त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे असे संबोधन डी पी सानप यांनी अमनवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले माननीय उपवन रक्षक वाशिम वनपरिक्षेत्र अधिकारी मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना नामशेष होत चाललेला चित्ता या प्राण्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व्हावी याकरिता मार्गदर्शन करण्यात आले यावेळी अमनवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भगतसर सह इतर शाळेतील सर्व शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वन्यप्राणी व त्यांचे संवर्धन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.