पाटोदा (प्रतिनिधी) बिलकीस बानो यांच्या वर अत्याचार करणाऱ्या व त्यांच्या नातेवाईकांची हत्या करणाऱ्या ११ जणांची केलेली सुटका रद्द करून त्यांना पुन्हा कठोर शिक्षा द्या, हजरत मोहम्मद (स.) यांच्या विषयी प्रत्येक वेळी अपमानाजनक टिप्पणी करणान्यांविरुद्ध कडक कारवाई करून त्यासाठी कायदा लागू करावा, भारतातील अल्पसंख्यांक समुदायावर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध कडक कायदा करावा. या प्रमुख मागण्यांसाठी पाटोद्यामध्ये संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने गुरुवार दि. १५ सप्टेंबर २०२२रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौका पासुन तहसिल कार्यालयावर महिलांचा भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. "हक के लिए लढना तो बगावत नहीं होती" अशी हाक देत महिलांनी एल्गार केला असून या निषेध मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. पाटोदा येथे संविधान बचाव संघर्ष समितीच्या बैठकीत महिलांचा भव्य निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. व या बाबतचे निवेदन पाटोदा तहसिलदार यांना देण्यात आले असून,दिनांक १५ सप्टेंबर २०२२रोजीच्या मोर्चाची पाटोदा तालुक्यात तयारी युद्ध पातळीवर सुरू असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व महिला एकत्र झाल्या नंतर छञपती शिवाजी महाराज चौक - बस स्टँड - हजरत राज मोहम्मद चौक - डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे पाटोदा तहसिल कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. मोर्चात बहुसंख्येने महिला भगिनी सहभागी होणार आहेत. या मोर्चाचे नियोजन देखील महिलांच्या नेतृत्वातच होणार आहे.