मालेगाव तालुक्यातील उडी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ७ सप्टेंबर रोजी जल संरक्षण व जल व्यवस्थापन या विषयावर वाशिम येथील पंचायत समिती सलग्नित ग्राम केकत उमरा येथील जलसेवक प्रदीप पट्टेबहादूर यांचे मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.    या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद व गणपती बाप्पा यांच्या मूर्तीस व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गावचे सरपंच रंजीत घुगे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष गजानन घुगे , युवा सामाजिक कार्यकर्ते हर्षल घुगे, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक अशांत कोकाटे उपस्थित होते. या वेळी जलसेवक प्रदीप पट्टेबहादूर बोलताना म्हणाले की  जल व्यवस्थापन करून आपल्याला जल संरक्षण करणे हे येत्या काळामध्ये  नितांत गरज आहे. पाण्याचा वापर हा योग्य व काटेकोर हवा तेवढाच केला पाहिजे. दिवसेंदिवस पाण्याची पातळी ही  खूप कमी होत आहे. याचे कारण की कुठल्याही प्रकारच्या आपल्याकडे व्यवस्थापन नसल्याने आपल्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. परंतु आपण जर त्याचे योग्य नियोजन करून रेन वॉटर हार्वेस्टिंग, कॅच द. रेन, छोटे छोटे उंच टेकडी भागावरती , खड्डे, बंधारे, बोरी बंधारा, पाणलोट क्षेत्रातील उपाय योजना, वॉटर कप स्पर्धा, शासकीय तथा निमशासकीय,इमारतीच्या छतावरील पाणी, समाज मंदिरावरील, पाणी,आपल्या आजूबाजूला असलेले उंच इमारती त्यावरील पाणी हे रेन वॉटर हार्वेस्टिंग च्या माध्यमातून जमिनीमध्ये कसे मुरवता येईल आणि पाण्याची पातळी