पाथरी(वार्ताहर)जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने दिल्या गेलेल्या पाथरी तालुक्यातील उत्कृष्ट जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सपत्निक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचा वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने १२ सप्टेंबर रोजी शांताबाई नखाते विद्यालय शिवाजीनगर पाथरी येथे सन्मान करण्यात आला.
अध्यक्षस्थानी जि.प.च्या माजी उपाध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई अनिलराव नखाते यांचा उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक दिलीपराव हिबारे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी मुकेश राठोड, लोणी चे सरपंच शामराव धर्मे,शिक्षणतज्ञ माऊली धर्मे,शिक्षणविस्तार अधिकारी,प्रल्हाद चोरमारे, बी.के. काकडे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद अंतरराष्ट्रीय शाळा माळीवाडा येथील प्राथमिक पदवीधर शिक्षक सोमनाथ डोंगरे व अस्मिताताई डोंगरे यांचा मान्यवरांचे हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.तर स्वच्छ शाळा पुरस्कार प्राप्त देवनांद्रा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री शामराव शिंदे यांचा व आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त व स्वच्छ शाळा पुरस्कार प्राप्त जिल्हा. परिषद प्राथमिक शाळा लोणीचे शाळा व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष रामभाऊ सौंदडे व मुख्याध्यापक नेताजी वागाळे, विषयतज्ञ रखमाजी कावळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक प्राचार्य किशन डहाळे यांनी केले.यावेळी विद्यार्थी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
▪️ जिद्द, चिकाटी व परिश्रमाचा प्रवास उत्कृष्ट पुरस्कारापर्यंत पोहचतो : सौ.भावनाताई नखाते.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार व स्वच्छ व आदर्श शाळांना पुरस्कार दिले.यामुळे पुरस्कार प्राप्त शिक्षक व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याई व शाळा व्यवस्थापन समीती पदाधिकाऱ्यांना निश्चित प्रोत्साहन मिळेल.प्रामुख्याने शिक्षक,मुख्याध्यापक, व शाळा समीती पदाधिकाऱ्यांमधील जिद्द, चिकाटी व परिश्रमाचा प्रवास उत्कृष्ट पुरस्कारापर्यंत पोहचला असे म्हणता येईल.शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी आपण समाजासाठी काही देणं लागतो या भावनेतून काम करून विद्यार्थ्यांना आदर्श नागरीक बनवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीले पाहिजे.हे काम करीत असतांना ग्रामीण भागात शिक्षकांना अनेक अव्हाण पेलत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास घडवून आणावा लागतो.अशा वेळी पालकांना सहभागी करून घ्यावे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. भावनाताई नखाते यांनी व्यक्त केले.तसेच पाथरी तालुक्यातील उकृष्ट जिल्हा पुरस्कार शिक्षक व शाळेचे मुख्याध्यापक व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.