हिंगोली शहरातील विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त हिंगोली शहरात दाखल झाले होते तर याचवेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली भावीक भक्तांची गर्दी लक्षात घेता कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तळ या दर्शना वेळी एका महिला भाविकाला रांगेतच चक्कर आल्याने त्यांचे तीन-चार वर्षाचे मुल त्यांना संभाळता येत नसल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असलेली महिला कर्मचारी आरती साळवे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या मुलास जवळ घेतले व त्या महिलेस रांगेच्या बाहेर काढून आरोग्य पथकाकडे नेऊन आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली व तसेच सदर मुलाचा महिला पोलीस कर्मचारी साळवे यांनी एक तास सांभाळ केला ते मूल झोपलेले असतानाही त्याला आपल्या कुशीत घेऊन त्यांनी बंदोबस्त केला त्यामुळे पोलीस कर्मचारी आरती साळवे यांचे भरभरून कौतुक करण्यात येत असून बंदोबस्तावर असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखविलेले ममत्त्व यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.