रासायनिक रंग आणि प्लॅास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील समस्त नागरीकांनी मातीच्या गणेशाची मुर्ती स्थापना करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्‍यात आले होते. अमरावती महानगरपालिकेच्‍या वतीने श्री. गणेश विसर्जनासाठी अभियंता भवन, शेगावं नाका, सहकार नगर ग्राऊंड, फार्मसी शासकीय विद्यालय कठोरा नाका, शिवाजी कमर्शियल मार्केट, रविनगर चौक, नेहरु मैदान, प्रशांत नगर बगीचा, मालटेकडी जवळ, वडाळी, विद्यापीठ चौक, पुलाजवळ, छत्री तलाव, मोती नगर बगीचा, साईनगर, साई मंदिर जवळ बडनेरा, झिरी तलाव, गोपाल नगर, जीम जवळ, बडनेरा बारीपुरा, रवि नगर, हनुमान नगर, बुधवारा या ठिकाणी नागरीकांना आर्टीफिशीयल टँकची सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आली होती. यावेळी महानगरपालिका मध्‍य झोन क्र.२ राजापेठ यांच्‍या वतीने स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरणपुरक गणपती मुर्ती स्‍थापन केल्‍याबद्दल महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रविण आष्‍टीकर यांच्‍या हस्‍ते अमरावतीकर निलेश कांचनपुरे, किशोर तळखंडकर, चंद्रशेखर बाकडे, पराग पाटील यांचा सन्‍मानपत्र देवून सत्‍कार करण्‍यात आला. हा सांकेतिक सत्‍कार करण्‍यात आला असून सर्व पर्यावरण पूरक गणपती मुर्ती स्‍थापन करणा-यांना प्रमाणपत्र देवून सन्‍मानित करण्‍यात येत आहे.यावेळी सहाय्यक आयुक्‍त नरेंद वानखडे, तांत्रिक सल्‍लागार जिवन सदार, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक विजय बुरे, माजी नगरसेवक अजय सारसकर उपस्थित होते.