उत्तरप्रदेश: पत्नी तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरत असताना पतीची नजर तिच्यावर पडली आणि हायवेवर सुरु झाला हायव्होल्टेज ड्रामा पती, पत्नी और वो उत्तरप्रदेशच्या आग्रामध्ये हा हाय प्रोफाईल ड्रामा समोर आला असुन एक महिला तिच्या बॉय फ्रेंडबरोबर ईलेक्ट्रीक स्कूटरवरुन एन्जॉय करत जात होते. त्याचवेळी पतीने तिचा पाठलाग सुरु केला. पतीच्या मागे बसलेल्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ बनविण्यास सुरुवात केली. पती जोरजोरात ओरडत असल्याने पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडने गाडी थांबविली आणि या दोघांमध्ये मारहाणही झाल्याचे सांगितले जात आहे.

या महिलेचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले असुन तिला एक मुलगी आहे. तिचे प्रेमसंबंध एका स्थानिक व्यापाऱ्याशी असल्याचा पतीला संशय होता. त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होता. ती महिला आज पतीला न सांगताच घराबाहेर गेल्याने पतीने तिचा पाठलाग केला.तिच्यासारखा ड्रेस दिसताच रंगेहाथ तिला बॉयफ्रेंडसोबत पकडले आणि शिवीगाळ करत मारहाण केली आहे.या प्रकाराची कुणकुण लागताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेचा पती आणि बॉयफ्रेंडला शांतता भंग केल्याच्या गुन्ह्याखाली दंड केला.तसेच दोघांनाही पुन्हा असा प्रकार न करण्याचा इशारा दिला आहे.