पंतप्रधान किसान योजनेसाठी सी एस सी सेंटर वर  के वाय सी पूर्ण केली जाऊ शकते सीएससी सेंटर शेतकऱ्यांच्या बोटाच्या ठशाद्वारे ई केवायसी पूर्ण केली जाऊ शकते या केंद्रावर या कामासाठी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आपले आधार कार्ड व  नोंदणी कृत मोबाईल नंबर आवश्यक आहे ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचा डाटा अपलोड दिनांक 14 सप्टेंबर पर्यंत पूर्ण होईल त्यांना पुढील बारावा हप्ता मिळणार आहे त्यामुळे जळकोट तालुक्यातील ज्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी ही केवायसी आतापर्यंत केली नाही त्या शेतकऱ्यांनी दिनांक 14 सप्टेंबर पर्यंत इ केवायसी करून घ्यावी असे आवाहन जळकोट  तहसीलदार सौ सुरेखा स्वामी यांनी केले आहे जळकोट तालुक्यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजने च्या तब्बल 2 हजार 800 लाभार्थी शेतकऱ्यांनी ही केवायसी करून घेतल्या नसल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे पुढील हप्ता शेतकऱ्यांना मिळणे अवघड होणार आहे त्यामुळे जळकोट तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्याने तात्काळ पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करून घ्यावी असे आव्हान तहसीलदार सौ सुरेखा स्वामी यांनी केले आहे देशाचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2019 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजनेची सुरुवात केली होती गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना नियमित उत्पन्न मिळवून देण्यासाठी मदत करणे हा या योजनेचा उद्देश होता सरकार वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकते वर्षातून सहा हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळते आतापर्यंत जवळपास दहा  हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत पण पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांसाठीही केवायसी करून घेण्याची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट होती परंतु या तारखेपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी ही केवायसी करून न घेतल्यामुळे पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे शेतकरी हे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ जो शेतकरी घेत असतील तर त्यांनी ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे जेणेकरून योजनेची रक्कम खात्यावर हस्तांतरित करता येईल अर्जदार लाभार्थी शेतकऱ्यांनी ई केवायसी करून न घेतल्यास त्यांना कोणताही लाभ मिळणार नाही.