पावसामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप

 प्रतिनिधी

मांजरी(ता. हवेली)येथील परीसरात रविवारी (दि. ११) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या जोरदार पाऊसाने मांजरी(खु) परीसरातील रस्त्यावर अक्षरशः नदीचे स्वरूप आले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या जवळपास मांजरी (खु)परीसरात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली.

  एक तासात मांजरी परीसरातील रस्ते नदीस्वरुपात वाहु लागले होते.काही ठिकाणी सकल भागातील राहात्या घरात पाऊसाचे पाणी शिरले होते.एक तासात गावातील अनेकांची दाणादाण केली.अनेक शेतकऱ्यांची तरकारी पिके जमिनदोस्त झाली.कोंथिबीर, टोमॅटो,फ्लॉवर,कोबी पिकांचे आतोनात नुकसान झाले.