हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव तालुक्यामध्ये 8 हजार 543 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सेनगांव यांच्याकडून प्राप्त झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमधील लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी बायोमेट्रिक पद्धतीने करणे बंधनकारक असून त्याच अनुषंगाने सेनगांव तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभाग व प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील 2 लाख 937 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 1 लाख 66 हजार 242 शेतकऱ्यांनी ई केवायसी केली आहे तर 34 हजार 695 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी आहे.यामध्ये सेनगांव तालुक्यातील 8 हजार 543शतकऱ्यांचा समावेश असून 14 सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी ई केवायसी प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे.