रत्नागिरी : बदलत्या शिक्षण पद्धतीत व ऑनलाइन जमान्यामध्ये पालकांनीही संगणक शिक्षण घेतले पाहिजे. मुले संगणक शिक्षण शाळेतच घेतात, परंतु पालकांनीही या संगणक शिक्षणात अद्ययावत व्हावे या करिता रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या बारटक्के इन्स्टिट्युटच्या वतीने संगणक प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
या कार्यशाळेत रा. भा. शिर्के प्रशाला व आणि ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमधील पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मोबाईलमधील नवनवीन फिचर्स, संगणक वापरणे, टायपिंग, समाजमाध्यमांचा योग्य वापर याबाबत प्रशिक्षण मिळावे, अशी संकल्पना इन्स्टिट्यूटच्या शालेय समिती अध्यक्ष डॉ. कल्पना मेहता यांनी व्यक्त केली. त्यानुसार पालकांनीही तयारी दर्शवली. याला अनुसरून प्रथमच ही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली. कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला.
समारोप कार्यक्रमाला डॉ. मेहता, शिर्के प्रशालेचे शालेय समिती अध्यक्ष मनोज पाटणकर, सी. ए. वरदराज पंडित, ल. ग. पटवर्धन विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका आसक्ती भोळे व सर्व शिक्षक उपस्थित होते. तीन दिवसांच्या कार्यशाळेची सांगता प्रशस्तीपत्रक वितरण कार्यक्रमाने झाली. याप्रसंगी पालकांनी मनोगत व्यक्त करताना या कार्यशाळेसाठी तयार केलेल्या अभ्यासक्रमाचे आणि अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले. अशा कार्यशाळा जास्त कालावधीच्या घेण्यात याव्यात, अशी मागणी देखील केली. ही कार्यशाळा घेण्यासाठी बारटक्के इन्स्टिट्यूटचे समन्वयक डॉ. अतुल पित्रे व मुख्याध्यापिका भोळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचे र. ए. सोसायटीचे पदाधिकारी व बारटक्के इन्स्टिट्यूटच्या शालेय समिती सदस्यांनी कौतुक केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी बारटक्के इन्स्टिट्यूटमधील शिक्षिका, शिक्षकांनी योगदान दिले.