बीड प्रतिनिधी- घोडक राजुरी जिल्हा परिषद शाळेमध्ये सगळा वेगळा पद्धतीने गणेश विसर्जन करण्यात आले आहे यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग होता
बीड तालुक्यातील खोडका राजुरी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत गणपती बसवला होता या गणपतीचे विसर्जन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दाटून आला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी विद्यार्थ्यांनी लेझीम आणि मुलींनी फुघडी खेळत निरोप दिला आहे मिरवणुकीच्या पूर्वी गणेशाची आरती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत घोडके यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मिरवणूक निघाली गावात सर्वत्र प्रभात फेरी सारखीच ही मिरवणूक काढण्यात आली होती त्याचबरोबर विद्यार्थ्यांची बँड वरती नृत्य आणि मुलींची फुगडी आकर्षक ठरले आहे शिक्षक एचडी गायकवाड आणि ठोंबरे जी.आर आणि शिक्षक कर्मचारी यावेळी उपस्थित होते