माजलगाव :- तालुक्यातील नाकलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गत दोन वर्षांत विविध घोटाळ्यातील ही रक्कमखरी माहिती समोर आल्यानंतर मुख्याध्यापकाकडून वसूल करीत शाळेच्या विविध विकासासाठी माजलगाव गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी शाळा दुरुस्तीचे बांधकाम केले.
योजनांतर्गत आलेली रक्कम
मुख्याध्यापकाने स्वत:साठी
वापरल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर
ग्रामस्थांनी शाळेतील
येथील मुख्याध्यापक लक्ष्मण मुंडे यांनी सन २०२०-२१ या कार्यकाळात समग्र शिक्षा व पर्यावरण संदर्भातील योजनेतील एक लाख दोन हजार शंभर रुपयांचा घोटाळा केल्याचा प्रकार येथील सामाजिक कार्यकर्ते सुहास झोडगे व ग्रामस्थांच्या लक्षात आला. याचीच दखल घेत मुख्याध्यापकावर कारवाईची गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे नाकलगाव ग्रामस्थांनी केली. मात्र,
याची दखल न घेतल्याने ११ जुलै रोजी शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकले होते. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी बेडसकर यांनी शाळेत दिवसभर बसून ग्रामस्थ व मुख्याध्यापकाच्या उपस्थितीत बैठक घेतली या बैठकीत मुख्याध्यापकाने घोटाळा केल्याचे निष्पन्न झाले. घोटाळा केलेली सर्व रक्कम मुख्याध्यापकाने बीईओंकडे दिली.
ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर चौकशी समिती सुद्धा नेमली होती मुख्याध्यापकाने परत केलेली ९० हजार रक्कम गटशिक्षणाधिकारी बेडसकर यांनी शाळेतीलच एका शिक्षकाच्या बँक खात्यावर वर्ग केली.
चौकट :-
पाच जणांची समिती ने प्रकरणात त्या पैशाचा यथायोग्य वापर करीत
शाळेसाठी बांधकाम करण्यात आले. यात वर्गखोली दुरुस्ती, छत दुरुस्ती, शौचालयाच्या दुरुस्तीचे काम नुकतेच पूर्ण झाले.
चौकट :-
पण घोटाळा करणाऱ्या मुख्याध्यापकावर
कारवाई होणार का?
या प्रकरणात ग्रामस्थांच्या सजगतेमुळे घोटाळा तर उघड झाला. मात्र, दोन महिने होऊनही शिक्षण विभागाद्वारे संबंधित मुख्याध्यापकावर कसलीही कारवाई केली नसल्याचे निदर्शनास येत आहे. आम्हाला कारवाई करण्याचा अधिकार नाही, कारवाईचा अहवाल आम्ही चार दिवसांपूर्वी वरिष्ठांना पाठवला असल्याचे गटशिक्षणाधिकारी बेडसकर यांनी सांगितले.