हत्यार बाळगणारे दोघे जणं पोलिसांच्या ताब्यात..
पैठण-
पैठण शहरातील इंदिरानगर भागात दोन इसम आज दि.30 जुलै रोजी स्वतःच्या ताब्यात गुप्ती सारखे हत्यार बाळगून आहेत अशी माहीती पैठण पोलिसांना भेटली असता त्यावरून तात्काळ पथक पाठवून सदर प्रकरणी खात्री केली करून दोन इसम नामे 1) संदीप अशोक सोनवणे आणि 2) उमेश अंकुश निकम दोन्ही राहणार इंदिरानगर पैठण यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात 25 सेमी लांब आणि 02 सेमी रुंद धारदार पाते असलेले आणि 26 सेमी मूठ असलेले दोन गुप्ती शस्त्र मिळून आल्याने त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असून ही कारवाई हेड कॉन्स्टेबल माळी, पोलीस नाईक गोपाल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अंकुश शिंदे मुजी ब पठाण तपास हेड कॉन्स्टेबल दांडगे करीत आहेत.