ॲड. सचिन राम पाटील एरंडे यांना आदर्श राज्यस्तरीय पुरस्कार....
मान्यवरांच्या हस्ते आदर्श वकील म्हणुन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करुन सत्कार करण्यात आला आहे....
बिडकिन प्रतिनिधी: ॲड. सचिन राम पाटील एरंडे यांना ए.आय.एस.ए.एफ वैद्यकीय समिती यांचे वतीने आदर्श वकील पुरस्कार ०५.०९.२०२२ रोजी खुलताबाद (जिल्हा संभाजीनगर) येथे प्रदान करण्यात आला. अॅड. सचिन राम पाटील एरंडे यांनी न्यायालयीन, शैक्षणीक, समाजीक या क्षेत्रात उलेखणीय कार्य केले आहे. यावेळी वैद्यकीय समितीचे महाराष्ट्र राजाध्यक्ष डॉ. अमोल जाधव यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ, फेटा बांधुन प्रशास्ती पत्रक देवुन सत्कार करण्यात आला. राज्यस्तरीय आदर्श वकील पुरस्काराने गौरविण्यात आले अॅड. सचिन राम पाटील एरंडे यांना पुरस्कार देण्यात आला आहे. प्रमुख पाहुणे डॉ. जगदीश हेडाऊ, साई महाशब्दे, प्राचार्य ज्ञानप्रकाश भार्गव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे कॅबीनेटमंत्री श्री. संदीपान पा. भुमरे साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख, राजेंद्र जंजाळ, विलास बापु भुमरे मा. सभापती जि.प. औरंगाबाद अंकुश रंधे, मा. संचालक औरंगाबाद जि. बँक, राम पा. एरंडे संचालक कृषी उ. बा. समिती पैठण, विनोद बोंबले उपजिल्हाप्रमुख शिवसेना संभाजीनगर, आदींनी अभिनंदन केले आहे.यावेळी ॲड एरंडे पाटील यांना आदर्श राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे..
रविंद्र गायकवाड, बिडकिन