धारूर / प्रतिनिधी : धारूर गेले आहे . ग्रामीण रुग्णालय सध्या वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे . ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक हे अंबाजोगाई वरून कारभार हकत आहेत आज सकाळी धारूर ग्रामीण रुग्णालयामध्ये काही रुग्ण व पत्रकार बांधव गेले असता वैद्यकीय अधीक्षकांची १० ते साडेबारा या वेळेमध्ये रिकामी खुर्ची होती . रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी होती . तरी देखील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची रिकामी खुर्ची पाहून रूग्णांना परतावे लागले आहे . धारूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वेळेवर येत नसल्याने नियोजन पूर्ण ढासळून धारूर ग्रामीण रुग्णालयास काही दिवसांपूर्वीच कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक म्हणून अंबाजोगाई येथील डॉ सुनील जाधव यांना नियुक्ती देण्यात आली आहे . परंतु हे अंबाजोगाई वरून कारभार हाकत आहेत नियोजित ठिकाणी राहत नसल्याने पुन्हा एकदा धारूर ग्रामीण रुग्णालय सलाईनवर असल्याचे दिसून येत आहे . आज सकाळी येथील नागरिक सामाजिक कार्यकर्ते अतीक मोमिन व काही पत्रकार बांधव गेले असता वैद्यकीय अधीक्षकांच्या केबिनमध्ये दोन ते तीन तास थांबले परंतु अधीक्षक काही मला आज काही काम असल्याने मी रुग्णालयात येऊ शकलो नाही मी काल रुग्णालयात होतो मी उद्या येणार आहे . पत्रकारांनी विचारले असता भ्रमणध्वनी वरून या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सुनील जाधव यांनी अशी प्रतिक्रिया दिली . आलेच नाही गोरगरीब रुग्णांना मात्र ताटकळत बसावे लागले होते . यामुळे धारूर ग्रामीण रुग्णालय सध्या पूर्णपणे वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे लोकप्रतिनिधीनो या रुग्णालयाकडे जाणारा रस्ता तर चांगला नाहीच वेळोवेळी मागणी करून देखील हा रस्ता केलेला नाही परंतु कमीत कमी लक्ष देऊन रुग्णांना आरोग्य सुविधा तरी व्यवस्थित द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तसेच सामाजिक संस्था करत आहेत दांडी मारणाऱ्या वैद्यकीय अधीक्षकांवर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कारवाई करण्याची मागणी देखील समोर येत आहे .