सोलापूर - आरोग्याची काळजी घेणेसाठी व्यायाम व सकस आहार आवश्यक आहे. आजाराचे वेळेत निदान होणे आवश्यक आहे. असे मत डाॅ. दिपक गायकवाड यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेत राजीव गांधी प्रशासकीय सुधारणा अभियान अंतर्गत जिल्हा परिषदे मधीस कर्मचारी यांचे साठी आरोग्य या विषयावर डाॅ. दीपक गायकवाड, डाॅ. प्रतिभा पाटील व डाॅ. नेहा जगदाळे गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे होते.
या प्रसंगी या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार,माजी मुख्य लेखा व वित्त अधिकारी गौतम जगदाळे, कार्यकारी, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, कार्यकारी अभियंता दिपक कोळी, धनाजी गायकवाड, डाॅ. दीपक गायकवाड, डाॅ. प्रतिभा पाटील, डाॅ. नेहा जगदाळे, प्रमुख उपस्थित होते.
योगामुळे आत्मीक मनशांती - डाॅ. प्रतिभा पाटील
योगामुळे मनाची एकाग्रता व संतुलन राहणेस मदत होते. योगामुळे मनावर नियंत्रण ठेवणेस मदत होते. योगासने करा. असा सल्ला डाॅ. प्रतिभा पाटील यांनी अधिकारी व कर्मचारी यांना दिला. या प्रसंगी. डाॅ. नेहा गायकवाड यांनी महिलांचे आजार व घ्यावयाची काळजी या बाबत मार्गदर्शन केले. आंतरात्मा समजून घेणे साठी गुरूची आवश्यकता आहे. असेही पाटील यांनी सांगितले.
योगासनाने कर्मचारी झाले हलकेफुलके …!
जिल्हा परिषदे मध्ये कामाच्या ताणतणावात व्यस्त असलेले अधिकारी व कर्मचारी यांना यशवंतराव चव्हाण सभागृहात डाॅ. प्रतिभा पाटील यांनी प्रात्यक्षिका सह योगाची माहिती सांगितली. श्वास घेणेचे योगाचे विविध प्रकार सांगून त्यांनी प्रात्यक्षिके करून घेतली. या प्रात्यक्षिका मुळे कर्मचारी यांनी चांगला विरंगुळ्या बरोबर हलकेफुलके वाटून योगाची गोडी निर्माण झाली.
सिईओ स्वामी यांनी केली योगासने….!
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी योगासने करून सर्वांना धक्का दिला. स्वतःची सिईओ दिलीप स्वामी हे योगासनांमध्ये सहभागी झाल्याने सर्व कर्मचारी आनंदाने या योगासनाच्या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाले होते.