सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचारी यांचे रांगोळीतून नाविण्यपुर्ण योजना साकारल्या आहेत. या रांगोळीची दखल राज्य निवडणूक आयोग व यशदा यांनी घेतली असलल्याची माहिती सिईओ दिलीप स्वामी यांनी दिली. या स्पर्धेत कृषी विभागाने काढलेल्या रांगोळीस प्रथम क्रमांक देणेत आला.
सोलापूर जिल्हा परिषदे मघ्ये गणेशोत्सवा निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करणेत आले आहे. या उपक्रमाचे पारितोषिक वितरण यशवंतराव चव्हाण सभागृहात सिईओ दिलीप स्वामी व अतिरिक्त सिईओ संतोष धोत्रे यांचे हस्ते करणेत आले. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, जिल्हा कृषी अधिकारी अमोल कुंभार, प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचारी यांनी आपल्या कुंचल्यातून सायकल बॅंक, जीवनाची हमी.बालमृत्यु कमी, जलजीवन मिशन, माझी वसुंधरा, माझे मुल माझी जबाबदारी, आझादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा, झाडे लावा.. झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव असे विविध नाविण्य पुर्ण उपक्रमाच्या छटा रांगोळीतून दिसून आल्या.
सिईओ दिलीप स्वामी यांनी विविध नाविण्य पुर्ण योजना सोलापूर जिल्ह्यात राबविणे साठी सर्वाना विश्वासात घेऊन घेतलेले परिश्रम सत्कारणी लागले आहे.
शाश्वत आनंदाला मुकू नका- सिईओ दिलीप स्वामी
कलेचा आनंद वेगळा आहे. शाश्वत आनंदाला मुकू नका. कलेचे अनन्यसाधारण महत्व आहे. रांगोळी काढतानाचा आनंद वेगळा आहे. हा आनंद पैशाने विकत मिळणार नाही. या स्पर्धेतील सर्व रांगोळ्या वेगळ्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने व यशदाने याची दखल घेतली आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
कृषी विभागाची रांगोळी प्रथम..!
………………….
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे कर्मचारी यांनी आझादी का अमृत महोत्सव व व नाविण्य पुर्ण उपक्रमांत काढणेत आलेल्या रांगोळीस प्रथम क्रमांक देणेत आला. दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे कर्मचारी यांनी काढलेल्या रांगोळी द्वितीय तर ग्रामपंचायत विभाग व शिक्षण विभागास तृतीय क्रमांक विभागून देणेत आला. सुत्रसंचालन विवेक लिंगराज यांनी केले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील व पतसंस्था संचालक मंडळाने खूप चांगला कार्यक्रम घेतला. दररोजच्या त्याच त्या कामातून बाहेर येत यानिमित्ताने आमच्या महिला कर्मचाऱ्यांना आनंद मिळाला. पारितोषिक मिळणं गौण आहे परंतु या निमित्ताने मिळालेला आनंद महत्वाचा आहे.
*रांगोळी स्पर्धेचा निकाल*
उत्तेजनार्थ पारितोषिके एकुण चार
1- पंचायत समिती उत्तर सोलापूर - महाराष्ट्राची शान पैठणीचा मान
2- समाज कल्याण - सायकल बॅंक रांगोळी
3- सामान्य प्रशासन विभाग - बेटी बचाव बेटी पढाओ रांगोळी
4- ग्रामपंचायत विभाग - माझी वसुंधरा रांगोळी
*तृतीय क्रमांक - विभागून*
अर्थ व ग्रामीण पाणीपुरवठा - हर घर तिरंगा व हर घर जल रांगोळी
*द्वितीय क्रमांक विभागून*
पंचायत समिती दक्षिण सोलापूर व शिक्षण विभाग प्राथमिक -
बेटी बचाव बेटी पढाओ व माझी शाळा सुंदर शाळा रांगोळी
*प्रथम क्रमांक*
कृषी विभाग
आझादी का अमृत महोत्सव रांगोळी
उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील म्हणाल्या की कालच या उपक्रमाची माहिती समजल्यानंतर निवडणूक आयोग व यशदाने रांगोळी स्पर्धेची छायाचित्रे पाठवून द्या म्हणून निरोप आला. यशदा त्यांच्या प्रशिक्षण सत्रावेळी आपल्या रांगोळी स्पर्धेची छायाचित्रांचे पोस्टर लावणार आहेत. त्यामुळे हा आमच्या महिला कर्मचाऱ्यांच्या कष्ट व कौशल्याचा गौरव झाला आहे. आमच्या महिला कर्मचाऱ्यांचे यानिमित्ताने राज्यभर कौतुक होणार याचा खरा आनंद आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन चंचल पाटील, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, सुनील कटकधोंड, पतसंस्था क्रमांक 1 चे चेअरमन हरीबा सपताळे, संचालक अनिल जगताप, तज्ञ संचालक डॉ. एस पी माने, श्रीशैल्य देशमुख, दीपक घाडगे, दत्तात्रय घोडके, सुहासचेळेकर, शहाजान तांबोळी, सुंदरराव नागटिळक, विष्णू पाटील, मृणालिनी शिंदे, सुनंदा यादगिरी, सुखदेव भिंगे, त्रिमूर्ती राऊत, शेखर जाधव यांच्यासह कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव दत्तात्रय देशपांडे, सुभाष काळे, अशोक पवार, नितीन येमुल्, जगदेवी अजनाळकर आदींनी परिश्रम घेतले.तर संचालक अनिल जगताप यांनी आभार मानले.