प्रतिनिधी | बीड

 दिल्लीत गुरूवारी झालेल्या कॅटच्या राष्ट्रीय बैठकीत सर्वानुमते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि मराठवाडा अध्यक्षपदी बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे विद्यमान अध्यक्ष संतोष सोहनी यांची निवड करण्यात आली आहे.

 दिल्ली येथील हॉटेल ओबेराय येथे गुरूवार ८ सप्टेंबर २०२२ रोजी कॅटची राष्ट्रीय बैठक पार पडली. या बैठकीत कॉन्फ्रेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल व उपाध्यक्ष धैर्यशीलजी पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सचिन निवांगुने, शंकर भाई ठक्कर, महेश भाई बकाई, सुरेश टक्कर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सोहनी यांची सर्वानुमते कॅटच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि मराठवाडा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.या निवडी बद्दल संतोष सोहनी यांचे बीड शहर व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष विनोद पिंगळे, दत्तप्रसाद तापडीया ,रविंद्र बजगुडे, जितेश पडधरिया , जवाहरलाल कांकरीया ,सुरेश बरगे, संजय सोळंके, मयुर बडेरा, सुनील कलंत्री, डॉ.चेतन मुनोत, वर्धमान खिवंसरा, नंदकुमार बियाणी, महेश आदे, सुर्यकांत महाजन, भास्कर गायकवाड, प्रमोद निनाळ, राहुल खुरपे, प्रताप खरात, मिलन ललवाणी यांनी स्वागत केले आहे.