सोनवाडी खुर्द शिवारात सतरा वर्षीय तरूणांचा मृत्यू सापडला.‌‌.

पाचोड(विजय चिडे)पैठण तालुक्यातील सोनवाडी खुर्द येथील एक तरुण गेल्या चार दिवसांपूर्वी शिकाऱ्यासाठी गेला असता तो चार दिवस उलटूनही घरी आला नाही. मात्र (दि.८ )रोजी दुपारी चारच्या दरम्यान या तरुणाचा कपाशीच्या शेतामध्ये मृत्यू आढळल्याची घटना घडली असून जयसिंग चकणेश चव्हाण (वय१७)असे मृत्यू तरुणांचे नाव आहे.

यावेळी सविस्तर माहिती अशी की, सोनवाडी खुर्द येथील जयसिंग चव्हाण व त्यांचे कुंटूब हे गायरान जमीन कसून त्यांत येणाऱ्या पिकांती पैशावर आपल्या कुंटुबांचा गाडा चावलत होते.जयसिंग हा चार ते पाच दिवसांपूर्वी मी शिकार करण्यासाठी चालो असे म्हणून घरातून निघून गेला होता.मात्र तो घरी आला नाही. त्यावेळी घरातल्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र नातेवाईकांकडे शोध घेतला होता. परंतु तो कुठेही नातेवाईकांकडे आढळून आलेला नव्हता. गुरुवारी त्याचे चुलते त्यांच्या शेताकडे गेले असता त्यांना जयसिंग चा मृत्यूदेह शेतातील कपाशीच्या शेताच्या बांधावरती आढळून आला.यावेळी त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ पाचोड पोलिसांना दिली असता पाचोड पोलिस ठाण्यांचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे, बीट जमादार अण्णासाहेब गव्हाणे, पोलीस नाईक पवन चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून त्या युवकाचा मृतदेह उतरणीय तपासणीसाठी औरंगाबाद येथे शासकीय घाटी रुग्णालय मध्ये पाठविण्यात आलेला आहे. जयसिग चव्हाण चा मृत्यू कशामूळे झालेल्या आहे हे अद्यापही अपष्ट आहे.याघटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यांत करण्यात आली असुन पुढील तपास पोलिस करीत आहेत.