आर्ट ऑफ लिव्हींगची श्री श्री रविशंकर बीड परिवाराकडून सुदर्शन क्रिया शिबिराचे आयोजन

बीड (प्रतिनिधी)- दि.13 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2022 पर्यंत सायंकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये आर्ट ऑफ लिव्हींगचे श्री श्री रविशंकर बीड परिवाराकडून सुदर्शन क्रिया शिबिराचे आयोजन हॅप्पीनेस सेंटर,मातोश्री निवास,प्रेरणा कॉलनी, पिंपरगव्हन रोड, बीड या ठिकाणी करण्यात आले आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंगची जगप्रसिद्ध सुदर्शन क्रिया या शिबिराचे आयोजन बीडमध्ये करण्यात आले आहे. सुदर्शन क्रियामुळे तणावरहीत मनासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये म्युझीक, मस्ती, धमाल, योग, ध्यान, प्राणायाम असा जल्लोष आहे.महत्वाचे म्हणजे सुदर्शन क्रिया जगातील 172 देशामध्ये करोडो लोकांनी याचा अनुभव घेतला आहे. सुदर्शन क्रिया ही जागतिक आरोग्य संघटना (थकज) मान्यता प्राप्त आहे. यामुळे तणावरहित मन, आरोग्य संपन्न, निर्णयक्षमता, तरुणांना अभ्यासामध्ये एकाग्रता,आंतरिक शक्तीचा अनुभव, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच मानसिक आजार, बी.पी.,कोलेस्टेरॉल मध्ये संतुलन, रोगप्रतिकारक शक्ती मध्ये वाढ, शुगर, कंबर दुखी, पाठदुखी, सांधेदुखी यासाठी सुदर्शन क्रिया फायदेशीर ठरते. या शिबिरासाठी बंगलोर प्रशिक्षित मास्टर ट्रेनर विश्वनाथ गडकर यांच्या सानिध्यात होणार आहे. हे शिबिर दि.13 सप्टेंबर 2022 ते 18 सप्टेंबर 2022 दरम्यान सायंकाळी 5 ते 8 या वेळेत हॅप्पीनेस सेंटर,मातोश्री निवास,प्रेरणा कॉलनी, पिंपरगव्हन रोड, बीड येथे होणार आहे. या शिबिराच्या नोंदणीसाठी 9657609777 संपर्क साधावा, तरी बीडमधील सर्वांना आर्ट ऑफ लिव्हींग आनंद अनुभुती शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त आर्ट ऑफ लिव्हींग परिवार यांनी केले आहे.