बीड दि.०८(प्रतिनिधी) बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या धर्मपत्नी ज्योतीताई ठाकूर यांनी राष्ट्रीय गणेश मंडळाच्या महिला पदाधिकाऱ्यांसह श्री गणेशाची महाआरती करून देखाव्याची पाहणी केली व गणेश मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले तसेच त्यांनी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कु. ऋतुजा सारडा, सौ सारडाताई, पायगुडे ताई, हारकेताई, कुलकर्णीताई, देशमुखताई, सारडाभाभी, यांच्यासह मंडळाच्या वतीने कुलकर्णी ताई, पायगुडे ताई, इगडे ताई, कैवाडे ताई, जाधव ताई, शिंदे ताई, वाघुलेताई, महालिंगेताई, घोडकेताई, कदम ताई, लड्डा ताई, मुसळे ताई, हारके ताई, तिवारी ताई, देशमुख ताई, ऋतुजा सारडा यांनी सत्कार केला. यावेळी संस्थापक अमृत काका सारडा, अध्यक्ष डॉ. अभिजित पायगुडे यांनी गणेश मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती सौ ठाकूर यांना दिली.
पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या धर्मपत्नी ज्योतीताई ठाकूर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय गणेश मंडळाच्या महिला पदाधिकाऱ्यांसह श्री गणेशाची महाआरती संपन्न
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/photos/2022/09/nerity_0c9a9ca3f657fc29f770d3d96c82b382.jpg)
![Like](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/reactions/like.png)