१२३ वर्षाची परंपरा कायम...दहा दिवस भावीक भक्ताची गर्दि असते

 टिळकांनी केली बारभाई गणेश मंडळाची पहिल्यांदा प्रतिष्ठापना

सेलू

इंग्रजांच्या मगरमिठीतून भारत देश स्वतंत्र करण्यासाठी प्रत्येक माणसाच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतविण्याचे काम लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यावेळी केले. समाज एकत्र राहिला, तर इंग्रजांना सळो की पळो करून सोडता येते, याचे भान लोकमान्य टिळकांना होते, त्यामुळेच त्यांनी लोकांना एकत्रित करण्यासाठी प्रत्येक गावात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले. १२३ वर्षांपूर्वी टिळकांनी सेलू येथे बारभाई गणेश मंडळाची पहिल्यांदा प्रतिष्ठापना केली.

१२३ वर्षांपूर्वी लोकमान्य टिळक सेलू शहरात आले होते. त्यावेळी मारबाडी मोहल्ल्यात काही मोजक्या प्रतिष्ठित व्यक्तींशी त्यांनी चर्चा केली. त्या बैठकीला बारा लोकांची उपस्थिती होती. त्याचवेळी सेलूत मारवाडी मोहल्ल्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोउत्सव सुरू करून स्वतःच्या हस्ते त्यांनी प्राणप्रतिष्ठा केली.या बैठकीला बाराच लोक उपस्थित असल्यामुळे त्या गणेश मंडळाचे बारभाई गणेश मंडळ, असे नामकरण केले. तेव्हापासून सुरू झालेली ही सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा बारभाई गणेश मंडळाच्या चौथ्या पिढीने सातत्यपूर्णपणे तेवढ्याच उत्साहात टिकवून ठेवली आहे. समर्थ स्वामी रामदासांनी

गावागावांत आध्यात्मिकता टिकवून ठेवण्यासाठी रामभक्त हनुमान मंदिरांची स्थापना केली. एवढेच नव्हे तर प्रत्येक माणसाची सुदृढता टिकून राहण्यासाठी आखाड्यांची निर्मिती केली. त्याच गोष्टीला डोळ्यासमोर ठेवून लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी समाज एकत्रित करून सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली. १८९९ मध्ये टिळक स्वतः सेलू येथे आले होते. त्यांनी एका बैठकीचे आयोजन करून भारतमातेला इंग्रजांच्या मगरमिठीतून सोडविण्यासाठी स्वातंत्र्यलढ्यातील - निखारे अधिक प्रज्वलित केले व प्रत्येक माणसाच्या मनात इंग्रजांविरुद्ध अग्निज्वाला भडकविली.

... *पुढील वर्षांपर्यंतची आधीच बुकिंग*

बारभाई गणेश मडळाला मूर्ती देण्यासाठी मंडळातील सदस्यामध्येच स्पर्धा निर्माण होते, पुढील कित्येक वर्षांची मूर्ती माझ्याकडून स्थापन व्हावी, या श्रद्धेपोटी अनेकांनी बुकिंग करून ठेवले आहे. दरवर्षी मूर्तीचा संपूर्ण खर्च श्रद्धापूर्वक एकच श्रद्धाळू करतो. ही परंपरा कित्येक वर्षापासून आजही कायम आहे. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होते. सर्व जाती धर्माचे लोक उत्सवात सहभागी होतात. मंडळाच्या पदाधिकाच्यांसह सर्वच सहकायाचा मदतीचा हात असतो. लोकमान्य टिळकांच्या हस्ते स्थापन झालेला महाराष्ट्रातील हा उत्सव सर्वांसाठी लक्षवेधी आहे.