जउळका येथील जय क्रांती गणेश उत्सव मंडळच्या वतीने 6 सप्टेंबर रोजी राम मंदिराजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल 18 गणेशभक्त रक्तदात्यांनी रक्तदान केले. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केल्या जात आहे. दरदिवशी घडणारे अपघात व विविध आजाराने ग्रस्त रुग्णांना रक्ताची गरज भासते. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये वारंवार रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक रुग्णांना वेळेवर रक्त पुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे सामाजिक जाणिवेतून जय क्रांती गणेश उत्सव मंडळातील गणेशभक्तांकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गावातील राम मंदिरा नजीक 6 सप्टेंबर रोजी आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 18 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सौ कांताबाई डाळे रक्तपेढी वाशिम येथील चमू चे जनसंपर्क अधिकारी गणेश चंद्रशेखर जीवन वानखेडे किसन गोटे विनोद सरकटे दीपक अंभोरे यांनी रक्तसंकलनकेले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले जय क्रांती गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष राहुल हिवरकर व सचिव अक्षय राऊत तथा सर्व सदस्य यांचे उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेे. यावेळी प्रमुख म्हणून ठाणेदार आजिनाथ मोरे ,पोलीस पाटील विजय सरोदेे, नंदकिशोर लड्डा राष्ट्रवादी अपंग सेल जिल्हाध्यक्ष हे होते यासह अनेक युवकांचे उपस्थिती होती