चोरीस गेलेल्या मोटारसायकली शोधण्यासाठी तब्बल ६५ सीसीटीव्ही कैमेरे तपासून २७ मोटारसायकल मालकांनी गुन्हे दाखल केल्यावर २७ गुन्हे दाखल करून २९ मोटारसायकली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मच्छिंद्र भागवत जाडकर, सचिन जालिंदर चव्हाण (दोघे रा.मोडनिंब) व दत्तात्रय रावसाहेब शेळके रा.अरण ता.माढा यांना अटक केली.शहरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे वाढले होते, त्याप्रमाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयित इसम गाडी विकण्यासाठी येणार ही माहीती मिळाल्यावर बोरामणी नाक्यावर सापळा रचून आरोपी मच्छिंद्र जाडकर यांस अटक करून ताब्यात घेतले.त्याने गुन्हा कबूल करुन सचिन चव्हाण व दत्तात्रय शेळके हे साथीदार असल्याचे कबुल करुन बनावट चावीने पार्किंग केलेल्या गाड्या चोरत होतो कबुल केले.चोरलेल्या गाड्या आरोपी शेतात ,कणसाच्या फडात ,घराच्या मागे लपवत होते असे त्यांनी कबुल केले .आरोपी पैकी दोन शेतकरी तर एक व्यापारी होता.पोलिसांनी आरोपींना अटक करुन त्यांच्याकडुनव ८ लाखब ४५ हजार किंमतीच्या २९ गाड्या जप्त करुन मे. न्यायालयासमोर हजर केले असता वेळोवेळी पीसी देउन शेवटी मे .वराडेसाहेब कोर्टाने आरोपींना जामीन मंजुर केला परंतु दुसर्‍या गुन्ह्याकामी वर्ग करणेकामी पोलिसांनी पत्र दिल्यावर मे.कोर्टाने पुन्हा पोलिसांच्या ताब्यात दिले.सदर कामी आरोपीतर्फे ऍड.बाबासाहेब जाधव , ऍड.श्रीकांत गडदे, ऍड.सारिका सारंगमठ तर सरकारतर्फे ऍड.देवमानेयांनी काम पाहिले.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं