सामाजिक बांधिलकी जपत नवरात्रोत्सवात विविध ठिकाणी रक्तपेढीच्या माध्यमातून शिबिरे आयोजित करण्यात आली होती . या दरम्यान ५५ शिबिरांतून १ हजार ३१४ रक्तदात्यांनी रक्तदान केले . शहरात नवरात्रोत्सवात कर्णपुऱ्यासह विविध मंडळांत आणि मंदिरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते . एमजीएम ब्लड बँकेने घेतलेल्या तीन शिबिरांत ४५ रक्तपिशव्यांचे संकलन केले . आदर्श ब्लड बँकेच्या ७ शिबिरातून २०५ जणांचे रक्तदान , लोकमान्य ब्लड बँकेमार्फत ९ शिबिरे घेण्यात आली . ज्यामध्ये १०५ जणांनी रक्तदान केले . लायन्स ब्लड बँकेने दहा दिवस कर्णपुऱ्यात शिबिरे घेतली . ज्यामध्ये १०१ जणांचे रक्तदान झाले . सर्वाधिक रक्तदान दत्ताजी भाले रक्तपेढीच्या माध्यमातून झाले . त्यांनी १४ शिबिरे घेतली . ज्यात ४३४ दात्यांनी रक्तदान केले . सत्यसाई ब्लड बँकेने घेतलेल्या ७ शिबिरांतून २७२ , शासकीय रक्तपेढीच्या ५ शिबिरांतून १५२ जणांनी रक्तदान केले . एकूणच नवरात्रामध्ये रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपली
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं