औरंगाबाद : दि.५ स(दीपक परेराव) देवगिरी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने एकूण 60 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून भावी इंजिनियर, डॉक्टर, विविध क्षेत्रात होणाऱ्या अधिकाऱ्यांनी शिक्षकांची जबाबदारी पार पाडली 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांनी शिक्षक हा राष्ट्र निर्माण करणारा प्रणेता असल्याचे प्रतिपादन केले. शिक्षक आपल्या माध्यमातून जगासमोर सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करतो आणि आयुष्यभर विद्यार्थ्यासमोर आदर्श म्हणून उभा राहतो .जीवनाला कलाटणी देत मार्गदर्शक ,ज्ञानदाता, दिशादर्शक, आणि वाटाड्याची अनमोल भूमिका पार पाडतो.

अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य प्रा.एन.जी.गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त दाखविलेला उत्साह आणि जोश असाच राहू द्यावा आणि विद्यार्थ्यांनी आपले प्रत्येक पाऊल विश्वासपूर्ण कसे पडतील याची दक्षता घेऊन जीवनामध्ये आनंद घ्यावा असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य प्रा. सुरेश लिपाने उपप्राचार्य प्रा. विजय नलावडे पर्यवेक्षिका प्रा. श्रीमती एम.आर. जाधव पर्यवेक्षक डॉ.किरण पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट अध्यापन कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये अनुक्रमे आदिती देशमुख, अनार्या डिडवाले ,अनन्या परतानी, नम्रता गायके ,दिशा करपे ,प्रदीप काळे, शितल तिजारे, दिपाली राठोड ,अनुष्का अनारसे ,यांचा समावेश आहे. 

तर विद्यार्थी उपप्राचार्य म्हणून युगा कोलते, विद्यार्थी पर्यवेक्षक संजय गुप्ता, आकांक्षा भोसले, समीक्षा साळुंके, शुभांगी खवले, साक्षी वीर तर विद्यार्थी सेवक म्हणून आदित्य खरात ,स्वप्निल वाघमारे, अमित बोरुडे, किशन बद्रे, स्वप्निल झेरवाल यांनी जबाबदारी पार पाडली. याप्रसंगी थाय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या सना सय्यद सिकंदर नेहरी, अजिंक्य नितनवरे यांचा सत्कार करण्यात आला.

शिक्षक दिन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप काळे यांनी केले तर समीक्षा साळुंके हीने आभार मानले