*आ. गुट्टे यांच्या हस्ते इसाद येथे विविध विकास कामांचे लोकार्पण*
माझ्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील माझी जनता हा माझा परिवार असून या परिवाराच्या भल्यासाठी माझं उर्वरित आयुष्य मी कारणी लावणार आहे. माझ्यावर संकट आले तेव्हा येथील जनता माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी राहिली असून माझ्या अडचणीच्या काळात मला साथ दिली आहे. त्यामुळे त्यांच्या उपकाराची परतफेड या जन्मी करणे शक्य नाही असे उद्गार आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी मौजे ईसाद येथे आमदार स्थानिक विकास निधी मधून देण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी काढले. यावेळी पंचक्रोशीतील सरपंच मंडळीसह गावातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना आ. गुट्टे म्हणाले की तुम्ही उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करा एकाही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही. तुमचा ऊस नेण्याची जबाबदारी पूर्णतः माझ्यावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस नेण्यासाठी घाई करू नये, यावर्षी प्रोग्राम नुसार यादी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयास लावली जाणार असल्याचे सांगितले.
मौजे इसाद येथे आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांचा स्थानिक विकास निधी २०२१-२२ या आर्थिक वर्षातून श्री दत्त मंदिर देवस्थानासमोर सभामंडप बांधकाम, श्रीहरी महाराज मंदिर सभामंडप बांधकाम, लिंगायत समाज स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधकाम व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पेव्हर ब्लॉक बसवणे या विकास कामाचे लोकार्पण आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते आज दि. ५ सप्टेंबर सोमवार रोजी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उद्धवराव सातपुते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून आ.डॉ.गुट्टे काका मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, माजी जि. प.सदस्य किशनराव भोसले, माजी समाजस कल्याण सभापती शिवाजीराव निर्दूडे, रासप जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, जिल्हा सरचिटणीस रवी भाऊ कांबळे, तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, राजेभाऊ बापू सातपुते, रामराव सातपुते, माजी सरपंच भगवानराव सातपुते, भूजंगराव सातपुते, भाऊसाहेब भोसले, उपसरपंच माऊली भोसले, संचालक बाळासाहेब पौळ, प.स.सदस्य नितीन बडे, ग्रा.पं. सदस्य बाळासाहेब भोसले, मारोती सातपुते, परसराम राठोड माजी सरपंच सर्जेराव सातपुते, सतीश पाटील, सुभेदार विश्वनाथ सातपुते, शेषराव चिलगर, भोजराव नाना सातपुते, रुस्तुम गुरुजी, भानुदास भाऊ भोसले, रमेश सातपुते बंडू सातपुते, शिवाजीराव शिंदे, बाळासाहेब शिंदे, आप्पासाहेब कदम, पोलीस पाटील अशोकराव भोसले, सरपंच प्रकाश नागरगोजे, बन्सी पवार, अंकुश पवार, निवृत्ती भेंडेकर, भास्करराव ठवरे, संतोष खोकले, शिवाजी शिंदे, हनुमंत मुंडे, शिवाजी मुंढे, वामन पवार, अंगद बडे, रामप्रभु बारगिरे, सुनील बारगिरे, माऊली पांचाळ, श्रीधर सातपुते यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी विठ्ठल सातपुते यांनी तर नितीन भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.