आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हा परभणीच्या वतीने परभणी शहर शाखा निवड तसेच १० व ११ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या महा. अनिसच्या राज्यकार्यकरिणीची होणाऱ्या बैठकी संधर्भात चर्चा व पुढील कामकाजाबाबत नियोजन करण्याच्या हेतूने परभणी शहरातील डॉ. मानवतकर चेस्ट हॉस्पिटल, गव्हाणे रोड येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

 

या बैठकीचे मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहर परभणीची शाखा गठण करणे होता या दरम्यान परभणी कार्याध्यक्षपदी डॉ. जगदीश नाईक तर प्रधान सचिवपदी प्रा. रफीक शेख व देविदास खरात आणि शहर अध्यक्षपदी इंजी. सहादू ठोंबरे यांची सर्वाणू मते नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्ष पदी संघमित्रा दामोधरे, उषा पंचांगे, कैलाश गायकवाड, वार्तापत्र प्रमुखपदी प्रा. ज्योती धुत्मल, प्रसिध्दी प्रमुख पदी शेख अझहर, युवा सहभाग प्रमुखपदी अमोल लांडगे, दुवाबाजी संघर्ष प्रमुखपदी प्रा. डॉ नवनाथ सिंगणापुरे, मानस मित्रपदी प्रा. डॉ. एम. एन. लिंगायत, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प प्रमुखपदी प्रा. संतोष सोनुले, प्रशिक्षण विभाग प्रमुखपदी सखाराम मस्के आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

 

या वेळी जिल्हाअध्यक्ष डॉ. रवींद्र मानवतकर, उपाध्यक्ष डॉ. परमेश्वर साळवे, एन. आय. काळे, कार्याध्यक्ष प्रा. प्रल्हाद मोरे, राज्य युवा सदस्य डॉ. सुनील जाधव, मुंजाजी कांबळे यांच्या सह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.