महाराष्ट्रातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडीतील तब्बल आठ विद्यार्थ्यांची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने केंद्र पातळीवर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये निवड झाली असून शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. यात सामान्यज्ञान स्पर्धेत अनन्या अशोक बांगर, सई दत्तात्रय साकोरे, साक्षी खंडू वाबळे, प्रश्नमंजुषा स्पर्धेत सर्वज्ञा संभाजी उमाप, ऋत्विज विशाल सावंत, वक्तृत्व स्पर्धेत स्वरूप प्रविण मस्के, सिद्धी शामकांत माळी, तर वेशभूशा स्पर्धेत मधुरा उत्तम काळे हिने क्रमांक पटकावला.
राज्यातील पहिली टॅबलेट शाळा, जगातली तिसरी आणि भारतातील पहिली 'झिरो एनर्जी स्कूल' यासह विविध वैशिष्ट्यामुळे नावारुपाला आलेल्या पुणे जिल्ह्यातील ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाबळेवाडीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने केंद्र पातळीवर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये केंद्रातील 18 शाळांनी सहभाग नोंदवला. यात वाबळेवाडीच्या तब्बल आठ विद्यार्थ्यांची केंद्र पातळीवर निवड होऊन शाळेला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. यात या विद्यार्थ्यांची पुढील बीट स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांना व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुरेखा वाबळे यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
निकाल जाहीर होताच ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांचा शाळेकडून मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, शिष्यवृत्ती तज्ञ एकनाथ खैरे, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरख काळे, प्रतिभा पुंडे, तुषार सिनलकर, दीपक खैरे, पोपट दरंदले, संदीप गिते, विद्या सपकाळ आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते.
तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुरेखा वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, माजी उपसरपंच भगवान वाबळे, ज्येष्ठ नागरिक केशव वाबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंकुश वाबळे, प्रकाश वाबळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
वाबळेवाडी शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तर मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले आहे.