चितेगाव परिसरात 71 वीजचोरांवर कार्यवाही...

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

बिडकिन प्रतिनिधी:- 

आज दि ०३ रोजी चितेगाव येथे बिडकिन 1 शाखा पैठण उप विभाग येथील चितेगाव गावठाण फिडर वर आज वीज चोरी पकडण्याची मोहीम राबविण्यात आली.

सदरील मोहिमेमध्ये मीटर मध्ये फेरफार करणारे, अकडे टाकून तसेच मीटर बायपास करणाऱ्या एकूण 71 वीज चोरांवर भारतीय विद्युत कायदा नुसार कारवाई करण्यात आली आहे तसेच फौल्टी असलेले एकूण 32 मीटर बदलण्यात आले

या मोहिमेमध्ये 7 शाखा अभियंता व 50 तांत्रिक कर्मचारी यांनी सहभाग घेतला

तसेच सदरील मोहीम मध्ये कार्यकारी अभियंता श्री विष्णू ढाकणे साहेब,श्री कल्याण रंधे उप कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता श्री अविनाश चव्हाण, श्री गणेश राठोड , ईश्वर तावरे, रोहित तायडे,सचिन सोमवंशी, सुजित वंगळ, ओमप्रकाश काळे, व तांत्रिक कर्मचारी श्री हाडे जितू, वाघ यांच्या सह 50 इतर कर्मचारी उपस्थित होते.

सदरील घटनेने परिसरात वीजचोरी करणारे मध्ये खळबळ माजली आहे.

रविंद्र गायकवाड, बिडकिन