बहिणीला जेवणाचा डब्बा सांगून भावाने धावत्या रेल्वेखाली स्वतः झोकून केली आत्महत्या.

जळगाव : (नितीन थोरात)शहरात बांगड्या विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.शेख इरफान शेख याकूब मनियार (वय ४५, रा. हाजी अहमदनगर, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील सालारनगर जवळील हाजी अहमदनगरातील रहिवासी शेख इरफान शेख याकूब मानियार (वय ४५) हे सराफ बाजारात बांगड्या विक्री करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. ते शिरसोली येथील मोठी बहीण मलेकाबी यांच्याकडे गेले होते. तेथे नाश्ता करुन निघाले आणि माझ्यासाठी कामावर डबा पाठवून दे असे बहिणीला सांगून घराबाहेर पडले. यानंतर शिरसोली रेल्वे स्थानकाजवळ त्यांनी दुचाकी लावून धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांची पत्नी रूखसानाबी या मुजाहिद व जैद अशा दोन्ही मुलांसह दोन दिवसांपासून नंदुरबार येथे माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे शेख इरफान घरी एकटेच असल्याने बहिणीकडे जेवायला जात होते.

 

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात…

इरफान यांनी बहिणीच्या घरून निघाल्यावर शिरसोली रेल्वे स्थानक गाठले. बाहेर गाडी लावून देत रेल्वे रुळाच्या दिशेने पायी चालत जाऊन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेस समोर स्वतःला झोकून देत त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. याबाबत स्टेशन मास्टरने एमआयडीसी पोलिसांना कळविल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे यशोधन ढवळे व समाधान टहाकळे घटनास्थळी धाव घेतली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घरात सर्व काही ठीक असताना शेख इरफान यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न नातेवाइकांनाही पडला आहे. त्यांच्या पश्चात आई फातेमाबी, पत्नी रूखसानाबी, मुजाहिद व जैद अशी दोन मुले, लहान भाऊ सलिम शेख व बहिणी असा परिवार आहे.