फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथे पावसाळ्यापूर्वी महावितरण कामे केले नसल्यामुळे पावसाने विद्यूत तारा तुटून पडल्याने या तारांचा स्पर्श होवून एक बैल व एक म्हैस मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.३०) रोजी घडली आहे. या घटनेत सुदैवाने टांग्यामुळे शेतकऱ्याला शॉक लागला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पावसाळ्यापूर्वीच विद्युत वितरण विभागाने व्यवस्थित कामे केली असती तर आज ही घटना घडली नसती. त्यामुळे या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महावितरण संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करू लागले आहे.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
तालुक्यातील बोरगाव अर्ज येथील शेतकरी रंगनाथ बलांडे हे जनावरांना चारण्यासाठी गेले होते.पाऊस आल्याने ते टांगा जूपून घराकडे निघाले. यात म्हैस व लहान बैल टांग्याच्या पाठीमागे बांधलेले होते.परंतु पाझर तलावा जवळ सुखदेव साठे यांच्या शेताजवळ विद्यूत तार तुटून पडलेल्या होत्या. याचा त्यांना अंदाज आला नाही. यात प्रथम टांग्याल्या जूंपलेल्या एका बैलान शॉक लागला.त्यात तो जागेवर कोसळला,त्यानंतर रंगनाथ बलांडे यांच्या लक्षात हा प्रकार आला. टांग्याच्या चागांना रबरी कवच असल्याने त्यांना शॉक लागला नाही. रंगनाथ बलांडे यांनी समय सूचकता दाखवून खाली उतरू की नको असा विचार करत असताना म्हैस पुढे गेली व तीला ही शॉक लागला. रंगनाथ बलांडे यांनी काळजी घेत टांग्याचा दुसरा बैल व मागे बांधले लहान बैल सोडवून त्यांचे प्राण वाचवले,तलाठी गणेश गोरे यांनी पंचनामा केला.