यवतमाळ : कोरोनाच्या दोन वर्षांच्या संसर्गानंतर मागील काही महिन्यांपूर्वी शाळा, महाविद्यालयसुरू झाले. ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाची बस जात नसल्याने विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून खासगी टेंपोतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळेच पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.बसचा प्रवास सुखकर प्रवास, असे राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीद वाक्य आहे. मात्र, ग्रामीण भागात जाणाऱ्या बसमध्ये आता खंड पडला आहे. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.पालकांनी वारंवार विभाग नियंत्रकाना भेटून गावात बस सुरू करण्याची मागणी केली. 30 बस स्क्रॅप करण्यात आल्या.त्यामुळे एसटी बस उपलब्ध होत नसल्याची अडचण सांगितली जात आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही अडचण सोडवावी अशी मागणी पालक करीत आहेत.