तोंडोळी एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम..
पाचोड(विजय चिडे) एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत तोंडोळी ता.पैठण येथे कृषी विभागाकडून( दि.१) रोजी संध्याकाळी आठ वाजता शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना असे म्हटले की,गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, कीटकनाशके हाताळताना घ्यावयाची काळजी इत्यादी बाबत तालुका कृषी अधिकारी शसंदीप शिरसाठ, मंडळ कृषी अधिकारी राधाकृष्ण कारले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने महिलावर्ग व शेतकरी उपस्थित होते. तसेच कृषी पर्यवेक्षक लगाने साहेब, कृषी सहाय्यक प्रमोद रोकडे, माहोरे,फोले, शिंदे, घोलवड साहेब उपस्थित होते