यवतमाळ : देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एका महिलेने घरकुलाचा लाभ मिळत नसल्याच्या संतापातून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेला पंधरा दिवस उलटूनही कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळे आता लाभार्थ्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.यवतमाळ तालुक्यात येणार्‍या वाई येथील शांता बनसोड या नावाच्या महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी दाखविलेल्या समयसुचकतेने महिलेचा जीव वाचला. परंतु, त्यानंतर महिलेला न्याय मिळणे अपेक्षित होते. सदर महिला 2011 पासून घरकुलाच्या प्रतीक्षा यादीत आहे. अजूनही घरकुल मिळत नसल्याने महिलेला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर पंचायत समितीच्या अधिकार्‍यांनी महिलेच्या घरी भेट दिली. त्यावेळी न्याय न देता केवळ टोलवाटोलवी करीत थट्टा केल्याचा आरोप जिल्हाधिकार्‍यांच्या भेटीसाठी आलेल्या नागरिकांनी केला 

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं