गेली चार दशके शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेबद्दल महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. आण्णासाहेब दत्तात्रय चव्हाण यांना विद्या प्रसारक मंडळ व डॉ. घाळी प्रतिष्ठान गडहिंग्लज यांच्यावतीने यांच्यावतीने देण्यात येणारा कै. डॉ. एस. एस. घाळी समाजभूषण पुरस्कार निवड समितीने जाहीर केला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा दि. २४ ऑगष्ट रोजी दुपारी ३ वाजता डॉ. घाळी सांस्कृतिक भवन गडहिंग्लज येथे श्री हरिकाका ऋग्वेदी भागवत मठ हत्तरगीचे पीठाधीश डॉ. आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांच्या शुभहस्ते व संस्था अध्यक्षा श्रीमती रत्नमाळा घाळी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख २५०००/ मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे आहे. याबाबतची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहसचिव गजेंद्र बंदी, प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, व्होकेशनल विभाग प्रमुख डॉ. प्रा. सुनील देसाई उपस्थित होते.