औरंगाबाद:- 1 सप्टेंबर, (दीपक परेराव) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने १ सप्टेंबर २०२२ रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा स्तरीय भव्य बैठक सिडको टाऊन सेंटर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे संपन्न झाली त्या मध्ये राज्य शासनाला मराठा आरक्षण आणि इतर सर्व प्रलंबीत मागण्या बाबत मुंबई येथे सविस्तर निवेदन देण्याचे ठरले आहे.मराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार असल्याचा जिल्हास्तरीय विशेष बैठकीत निर्णय घेण्यात आला.

               या निमित्त आयोजीत मराठा क्रांती मोर्चा जिल्हास्तरीय विशेष बैठक उत्साहात संपन्न होतांना या बैठकीत विविध विषयांचे प्रस्ताव सादर होऊन त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली त्या मध्ये प्रामुख्याने कोपर्डीतील पिडीत भगिनी श्रद्धाताई प्रकरणातील आरोपीना फाशी देण्याची प्रलंबीत प्रक्रिया पूर्णत्वास घेऊन जाणे बाबतचा प्रस्ताव विधिज्ञा सुवर्णा ताई मोहीते व सुकन्याताई भोसले यांनी मांडला तर सारथीची विविध समस्यां व मागण्या बाबतचा प्रस्ताव रविंद्र काळे पाटील यांनी मांडला तर मराठा समाजातील युवकांचे प्रलंबीत सर्वच विभागातील नियुक्ती पत्रे तात्काळ देणे बाबतचा प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली तर स्व.आण्णासाहेब पाटील आर्थीक विकास महामंडळाच्या साठी भरपुर निधी शासनाने देणे व जाचक अटी रद्द करण्या बाबत मागण्या साठीचा प्रस्ताव रमेश गायकवाड यांनी मांडला तर,मराठा आंदोलकावरील गुन्हे सरसगट वापस घेणे बाबतचा प्रस्ताव सुनिल कोटकर यांनी मांडला तर किल्ले संवर्धन समिती स्थापन करणे बाबतचा प्रस्ताव रवि पाडळकर यांनी मांडला तर धर्मदाय दवाखाण्यासाठी देखरेख करण्यासाठी मराठा समाजाची आरोग्य समिती स्थापन करणे बाबतचा प्रस्ताव अशोक मोरे यांनी मांडला तर मराठवाड्यातील आरक्षण याचिका स्थिती व त्यातील मुद्दे तसेच,आईच्या जातीचे प्रमाणपत्र पाल्यांना वापरू देणे व केंद्र शासनाने आरक्षणाची मर्यादा ५०%च्या पुढे वाढवणारे नचीअप्पन यांचा अहवाल मंजुर करावा यावर बाजू औरंगाबाद खंडपीठातील याचिकाकर्ते किशोर गणपतराव चव्हाण यांनी मांडली तर सर्वोच्च न्यायालयातील पुनर्विचार याचिका बाबत याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी बाजु मांडली तर बैठकीचा समारोप करतांना अध्यक्षस्थाना वरून आरक्षणाची सद्य स्थिती व कायदेशीर व घटनात्मक केंद्र शासनाकडे करावयाची मागणी व पर्याय व उपाय या वर सविस्तर मार्गदर्शन जेष्ठ अभ्यासक आणि सर्वोच्च न्यायालयातील मुख्यहस्तक्षेप याचिकाकर्ते राजेंद्र दाते पाटील यांनी केले.

महाराष्ट्र शासनाला द्यावयाचे निवेदन मसूदा या वर सविस्तर चर्चा होऊन निवेदन देण्यासाठी चार महिला-चार जेष्ठ समाज बांधव व अभ्यासक यांची निवड करणे बाबत चर्चा होऊन मराठा समाजातील मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले.आजच्या या महत्वपुर्ण बैठकीत विशेष बैठकीचे प्रास्ताविक मराठा आरक्षण  याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केले तर सूत्र संचालन व विषयांचे वाचन सचिन मिसाळ व वैभव बोडखे यांनी संयुक्तपणे केले तर उपस्थितांचे आभार सतीश वेताळ यांनी व्यक्त केले शेवटी शहीद बांधवांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने बैठकीचा समारोप झाला.या बैठकी साठी मराठा क्रांती मोर्चाचेपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते