वाशिम जिल्ह्यातील सर्व विभागातील गणेशोत्सव मंडळांच्या व श्रींच्या मूर्तीचे सुरक्षिततेसाठी सर्व गणेशोत्सव मंडपांना पोलिस दलाच्या वतीने QR Code लावण्यात आले असून संबंधित विभागातील पोलीस अधिकारी वअंमलदार, बिट मार्शल, निर्भया पथक व Dial 112 पथक हे सातत्याने गस्तीवर असून सदर QR Code Scaning मूळे प्रभावीपणे गस्त पेट्रोलिंग होणार आहे.त्यामुळे

नागरिकांनी'गणेशोत्सव-2022' भक्तिभावाने, हर्षोउल्हासात व आनंदाने नियमांचे पालन करत शांततेत साजरा करावा व शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यास पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वाशिम पोलीस दलातर्फे करण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.जिल्हा पोलिस दलाच्या वतीने सारे गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.