औरंगाबाद: राज्यात परतीच्या पावसाने झालेल्या पिकांचे नुकसानीमुळे विरोधी पक्षांसह राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे. परंतु राज्य सरकारकडून अद्यापही औरंगाबाद जिल्ह्यात पिकांचे पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याच्या वायगाव येथील शेतकरी आपली दिवाळी चक्क स्मशानभुमीत साजरी करत आहे. सरकारने आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष दिलेली नाही, पंचनामे सुरु झाले नाहीत, नुकसान भरपाई आम्हाला मिळालेली नाही. त्यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी मुलांना कपडे आणि फटाके नाही.
त्यामुळे शासनाच्या निषेधार्थ दिवाळी स्मशानभूमीतच साजरी करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी हेक्टरी 50 हजार रुपये भरपाई देण्यात यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली.