गणपती बाप्पा मोरया! आहे.मंगलमूर्ती मोरया या जयघोषात आणि ढोल ताशा, बँडच्या तालावर वाजत गाजत वाघोली परिसरामध्ये व गणरायांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे निर्बंध असताना यंदाच्या वर्षी निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्यामुळे अबालवृध्दांचा उत्साह द्विगुणीत झाला. पुढील दहा दिवसवाघोली नगरी गणेशमय होणार.