महाराष्ट्रातील मातंग समाज व्यसनाच्या , गुलामगिरीच्या आणि अज्ञानी पनाच्या चिखलात रुतंलेला आहे समाजाला या चिखलातून बाहेर काढण्यासाठी तरूणांनी पुढे यावे चळवळीत सामिल व्हावे आणि आपल्या हक्कासाठी एकजूट होऊन लढा द्यावा नाहीतर तुमची येणारी पिढी बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही समाजामध्ये प्रबोधन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन व्याख्याते डीपीआयचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी केले आहे .
कोळगाव याठिकाणी साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जंयती निमित्त प्रबोधन करतांना व डीपीआयची शाखा उदघाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपिठावर सुभाष लोणपे , सुनिल पाटोळे , बाळासाहेब पौळ , विधिज्ञ सोमेश्वर कारके , आनंद सरपते , संजय सुतार , अमोल सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती . पुढे बोलताना ते म्हणाले प्रत्येक धर्मातील लोक संत महतं किर्तनकार हेआठ आठ दिवस गावांमध्ये किर्तन करून प्रबोधन करतात म्हणून त्यांच्या समाजाची प्रगती आहे परंतू मातंग समाज आज पर्यंत अज्ञानी आणि अंधश्रद्धेने ग्रासलेला आहे तरूणपिठी व्यसनाधिन आहे यामुळे येणारी पिढीचे भविष्य अंधकारात जाईल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जो अधिकार दिला आपल्याला माणसु म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळात पुर्वाश्रमिचे महार आणि आत्ताचे बौध्द यांना सांगितले जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे बौद्धानी तो मंत्र स्विकारला आणि कठीण परिस्थितीचा सामना करूण शिक्षण घेतले याचां परिणाम आसा झाला की त्याचं जगावर अधिराज्य आहे हे कशामुळे झाले याचं एकमेव कारण आहे प्रबोधन त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्विकारले ज्यांनी स्विकारले ते आज आयपीएस , आयएएस , वकील , डॉक्टर , इंजिनीयर , आहेत आजही मातंग समाज गरीबी आणि अंंधश्रद्धेने ग्रासलेला आहे आज्ञानी आहे या समाजाला शिक्षणाची गरज आहे जसा पोटाला भूक लागल्याानंतर जेवनाची आवश्यक्यता असते तशी मेंदू चालवण्यासाठी ज्ञानाची भूक लागते म्हणून मी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जंयती निमित्त बीड जिल्ह्यातील तरूणांना आव्हान करतो की तुम्ही पुढाकार घ्या आणि समाजाला या चिखलातून बाहेर काढा बीड पॅर्टन हा महाष्ट्राच्या मातंग समाजाला क्रांतीकडे नेईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी तरूणांकडून व्यक्त केली यावेळी अमोल सुतार , देवेंद्र धुरंधरे , बंडू पवार, अशोक खरात , साई आडाळगे ,विशाल गायकवाड , पोपट गायकवाड , विकास गायकवाड , नितीन गायकवाड , सुधिर कदम , गौतम कदम , विशाल कदम , बाळासाहेब लोणके , अप्पासाहेब गायकवाड , शेखर गायकवाड , नितीन घोरपडे , कैलास कांबळे , गणेश कांबळे , हरी गायकवाड , रोहित कदम , सुमित गायकवाड , यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते .