मोहरे, ता. पन्हाळा येथील विद्यामंदिर शाळेसमोरील गेटजवळ खेळणाऱ्या ५ वर्षांच्या शंभो आप्पासो आभ्रे या मुलावर भटक्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. कुत्र्याने चेहऱ्याचे लचके तोडल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना समजताच शंभू याच्या नातेवाइकांनी धाव घेत मोकाट कुत्र्याला पिटाळले व मुलाची सुटका केली. त्याला मनसे जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेळके, राम नलवडे यांनी गाडीमधून बोरपाडळे येथील आरोग्यवर्धिनी केंद्र येथे तत्काळ दाखल केले; मात्र तेथे रेबीज लस उपलब्ध नसल्याने त्याला कोडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.