तोव लिबगावचा झेंड्याचा वाद पोलिसांनी मध्यस्थती करून मिटविला..

"समजात तेढ निर्माण होऊन नये म्हणून शांतता बैठक"

पाचोड(विजय चिडे) पैठण तालुक्यातील लिमगाव येथे (दि.२८)रोजी झेंडा बदल्यावरून दोन गटात जोरदार मारहाण झाल्याची घटना घडली हो.या संदर्भात पाचोड पोलिस ठाण्यांत दोन्हीही गटातील परस्पर तक्रारीवरून १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

या सविस्तर माहिती अशी की,लिबगाव येथील एक व्यक्ती गावातील समाज मंदिर समोर असलेला मातंग समाजाचा झेंडा बदलण्यासाठी गेला असता त्यास गावातील काही झेंडा बदलूनको असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली असे त्या व्यक्तीच्या तक्रारीत नमूद केले आहे तर परस्परधी तक्रारदारांने तक्रारीत असे नमुद केले की, ती जागा आमची असून या संदर्भात कोर्टात आमचे प्ररकण चालू आहे.तुम्ही झेंडा लाऊ नका असे म्हणत असतानाच त्यांनी आमच्यासोबत बाचाबाची करून आम्हांला फिल्मीस्टाईल हाणामारी केली असे म्हटले आहे. हे भांडण झालेवर दोघांनी गटांने पाचोड पोलिस ठाणे गाठून एकामेकांविरूध्द तक्रारी नोंदविल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत पाचोड पोलिस ठाण्यांचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे,उपनिरीक्षक सुरेश माळी,बीट जमादार आण्णासाहेब गव्हाणे,पोलिस नाईक पवन चव्हाण यांनी गावातील दोन्हीही गटातील व समाजातील त्याचबरोबर सरपंच,उपसरपंचसह प्रतिष्ठित नागरिकांना बोलवुन गणेश उत्साहात चालू झालेवर दोन्ही समाजात तेढ निर्माण होऊन नाही.याकरीता बैठक घेऊन हे भांडण शांतपणे मिटविले आहे.