दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील  माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतून उदयास आलेला "एक सायकल बहिणीसाठी" या उपक्रमांतर्गत कुंभारी केंद्रात एकूण 23 सायकलींचे वितरण करण्यात आले. केवळ अंतर जास्त असल्याने ज्या विद्यार्थिनी शाळेत उपस्थित राहू शकत नाही त्या विद्यार्थिनींना एक सायकल भेट देवून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीचा जिल्हा परिषद सोलापूरच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाला कुंभारी गावासह संपूर्ण कुंभारी केंद्रातून मदतीचा हात मिळाला. कुंभारी केंद्रातील 20 शाळांच्या प्रत्येकी एक याप्रमाणे 20 सायकली व जिल्हा परिषद सदस्य अण्णाप्पा बाराचारे यांच्याकडून एक सायकल व मा. केंद्रप्रमुखा राजगुरू मॅडम यांच्याकडून दोन सायकलांची वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सन्माननीय शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किरण लोहार साहेब उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा.कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील साहेब, जिल्हा परिषद सदस्य अण्णाप्पा बाराचारे साहेब, सरपंचा स्मृती निकंबे मॅडम, उपसरपंच सुरज पाटील साहेब, तसेच कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे साहेब, शिक्षण विस्ताराधिकारी जयश्री सुतार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे आयोजन केंद्रप्रमुख श्रीम. कुंदा राजगुरू मॅडम यांनी केले होते.