औरंगाबाद :- दि. २९ (दीपक परेराव) दौऱ्यानिमित्त मी कुठे असलो तरी धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आवर्जून येतो. आतापर्यंत कधीच धार्मिक कार्यक्रमात राजकारण केले नाही.
लोकमान्य टिळकांनी हा सार्वजनिक उत्सव सर्वांसाठी सुरू केला आहे.त्यामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्यांनी आम्हाला प्रोटोकॉल शिकवू नये. तसेच कधीमधी उपस्थित राहणाऱ्यांनी धार्मिक कार्यक्रमात राजकारण करू नका, असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
सिडको हडको गणेश महासंघ कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, माजी आमदार कल्याण काळे, समिती अध्यक्ष सागर शेलार, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात, माजी नगरसेवक किशोर नागरे, समीर राजूरकर, अनिल जैस्वाल, राजू इंगळे, राजू खरे, शिवाजी दांडगे, राजगौरव वानखेडे, संदेश कवडे,प्रकाश मते, आदींसह नागरीक व गणेश भक्त उपस्थित होते.