अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील एका आरोपीला शनिवारी नवी मुंबईतील खारघर परिसरात अटक केली. शिवदास भानुदास कांबळे राहणार . गणोरी तालुका . बाभुळगाव जिल्हा . यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे. गेल्या सहा महिन्यांपासून चोरीच्या गुन्ह्यात हा आरोपी पसार होता..तळेगाव दशासर पोलिस ठाण्यात आरोपी शिवदास कांबळेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात आरोपी हा अंदाजे सहा महिन्यांपासून फरार होता.
सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेतर्फे समांतर तपास सुरू केला. आरोपी हा मुंबईत असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली. या माहितीवरून तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक अमरावती येथून खारघर नवी मुंबई येथे आरोपी शोधकामी रवाना झाले. खारघर नवी मुंबई येथे पोहचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा खारघर शोध घेतला. दरम्यान सदर आरोपी हा खारघर रेल्वे स्टेशन येथे असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला खारघर रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले. आरोपीला पुढील कारवाईकरिता तळेगाव दशासर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.