रत्नागिरी /जिल्हा प्रतिनिधी

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

फेसबुकवर लकी ड्रॉ व्हिडिओची जाहिरात पाहून महिलेने कॉमेंट बॉक्समध्ये मोबाईल नंबर दिला. नंबरवरुन संशयिताने संबंधीत महिलेचे WhatsApp अकाउंटचे अँक्सेस घेऊन मी वरीष्ठ अधिकारी बोलत असल्याचे सांगून अनेक लोकांची फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले होते. या प्रकरणाबाबत सायबर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणूक करणाऱ्या संशयिताचा स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने शोध घेऊन उत्तर प्रदेशमधून मुसक्या आवळल्या आहेत. आबिद जाकर (वय 26, रा. सेशन, तालुका पहाडी, जिल्हा डीग, राज्य राजस्थान) असे संशयिताचे नाव आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील एका शासकिय अधिकाऱ्याच्या व्हॉट्सॲपवर अज्ञाताने 'मी वरिष्ठ आय.पी.एस. पोलीस अधिकारी बोलत आहे' असा आशयाचा एसएमएस पाठवला. व थोड्या वेळानंतर दूसरा एसएमएस आला की, मला तीस हजार पाठवा. मी तुम्हाला 2 तासात लगेच परत देतो. या आलेल्या एसएमएसची अधिकाऱ्याला शंका आली होती. तसेच याचदिवशी अनेक शासकीय अधिकाऱ्यांना देखील अश्याच प्रकारचे व्हॉट्सॲपवर एसएमएस आले. हा सर्व प्रकार दिनांक ३ नोव्हेंबर २०२३ रोजी घडला. याबाबत शासकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ सायबर पोलीस ठाण्याला माहिती दिली. या प्रकरणावरून अज्ञाताविरुद्ध रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात भा.द.वी. कलम 419, 420, 170(ब), 511 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर पोलसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला.

पोलीस अधीक्षक रत्नागिरी धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर स्था.गु.शा. रत्नागिरी यांच्या नेतृत्वाखाली या इसमचा स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाद्वारे तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्याद्वारे सातत्याने पाठपुरावा देखील सुरु होता.

संशयित आरोपी हा तालुका पसीयना, जिल्हा पटियाला, राज्य पंजाब येथे असल्याचे प्रथम तांत्रिक विश्लेषनाद्वारे निष्पन्न झाले. यानुसार पंजाब राज्यात दिनांक 06/11/2023 रोजी हे पथक रवाना झाले. परंतु गुन्ह्यातील वापरण्यात आलेला मोबाईल हा दोन राज्यांच्या सीमा लगत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस पथकाला सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागला. मात्र पुढील तपासात हा मोबाईल पटियाला, राज्य पंजाब येथील एका महिलेच्या असल्याचा निष्पन्न होऊन सदर महिलेच्या मोबाईल नंबर वर दिनांक 27/10/2023 ते दिनांक 03/11/2023 या दरम्याने WhatsApp वर कॉलिंग येणे बंद झाल्याचे तपास पथकाला निदर्शनास आले व सदर महिलेचा WhatsApp नंबर हा आरोपी इतरत्र बसून वापरत असल्याचे देखील निष्पन्न झाले.

या महिलेला नियमित फेसबूकवर एक “लकी ड्रॉ” व्हिडिओ पाहण्याची सवय होती व त्यामधीलच एका लकी ड्रॉ व्हिडिओमध्ये आपल्याला आयफोन व आयपॅड गिफ्ट स्वरूपात हवा असल्यास आपला मोबाईल नंबर खालील दिलेल्या कमेन्ट सेक्शन मध्ये नमूद करावा असे त्यामधील जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले होते. त्याप्रमाणे व्हिडिओच्या खाली नमूद कमेन्ट सेक्शनमध्ये या महिलेने आपला मोबाईल नंबर नमूद केला. याच नंबरचा वापर आरोपीने त्या महिलेला तुम्हाला आयफोन गिफ्ट लागला आहे व तो मिळवण्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला एक ओटीपी शेअर करा असे कॉल करून सांगितले.

या महिलेने ओटीपी शेअर करताच संशयित आरोपीने या महिलेचे WhatsApp अकाउंटचे अँक्सेस घेतले. या WhatsApp अकाउंटचा वापर पुढे जाऊन अनेक लोकांना व पोलीस अधिकार्‍यांना फसवणुकीचे कॉल करण्याकरिता वापर .

पोलिसांच्या पथकाकडून पुन्हा तांत्रिक विश्लेषण करण्यात आले व असे निष्पन्न झाले की, संशयित आरोपी हा राजस्थान या राज्यात बसून वरिष्ठ आय.पी.एस. पोलीस अधिकारी यांचा फोटो आपल्या WhatsApp च्या डीपीवर ठेवून तोतयागिरी करून फसवणुकीचे कॉल करत होता. या गुन्ह्यामधील आरोपी हा आपले नाव व पत्ता बदलून वास्तव्य करीत असल्यामुळे या तपासा दरम्यान पोलिसांचे पथक हे डिग, भरतपूर, राजस्थान येथे प्रचंड प्रमाणातील थंडीमध्ये (7° डिग्री तापमान) आरोपीचा शोध घेण्यासाठी दाखल झाले. दिनांक 28/12/2023 ते 08/01/2024 असे 12 दिवस वॉच करीत मुक्कामास होते. अखेर दिनांक 06/01/2024 रोजी 19.20 वाजता या गुन्ह्यातील आरोपी आबिद जाकर, (वय 26, रा. सेशन, तालुका पहाडी, जिल्हा डीग, राज्य राजस्थान) याला तालुका मथुरा राज्य उत्तर प्रदेश येथून या पथकामार्फत ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. संशयित आरोपी आबिद जाकरने गुन्ह्यासाठी वापरलेला मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर (स्था.गु.शा. रत्नागिरी), पोलीस निरीक्षक, श्रीमती. स्मिता सुतार, (सायबर पोलीस ठाणे), पोऊनि, योगेश खोंडे ( स्था.गु.शा. रत्नागिरी) पो.हवा शांताराम झोरे, पो.हवा बाळू पालकर, पो.हवा रमिज शेख यांनी केली.याबाबत अधिक तपास सायबर पोलीस ठाणमार्फत सुरू आहे.