चिरनेर येथील प्रसिद्ध तिरंगा पतपेढीची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी पतपेढीचे चेअरमन अलंकार अंकुश परदेशी यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.यावेळी तिरंगा पतपेढीच्या सभागृहाला कोकणचे भाग्यविधाते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे नाव देण्याचे कार्य रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आला .यावेळी महेंद्र शेठ घरत यांनी आपल्या मनोगता मध्ये दिवंगत बॅरिस्टर अंतुले यांच्या बद्दल रायगडच्या विकासासाठी केलेला कामाचा उल्लेख केला.तसेच तिरंगा पतपेढीचे कार्य अतिशय चांगले आहे वेळोवेळी गरजूंना कर्ज स्वरूपात मदत करणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, सभासदांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांना आर्थिक मदत करणे, कोरोना मध्ये गरिबांना, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत करणे अशा अनेक कार्य तिरंगा पतपेढीच्या माध्यमातून कौतुकास्पद कार्य होत आहे तसेच तिरंगा पतपेढीची भविष्यात खूप भरभराटी व्हावी अशा शुभेच्छा दिल्या. चिरनेर मध्ये यमुना सामाजिक, शैक्षणिक संस्थेतर्फे देण्यात आलेल्या ॲम्बुलन्स ची जबाबदारी सचिन घबाडी हे अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळात आहेत.म्हणून सचिन घबाडी व शितल घबाडी यांचे सुद्धा महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी रा जी प सदस्य बाजीराव परदेशी, माजी रा जी प सदस्य महेंद्र ठाकूर, सरपंच संतोष चीर्लेकर, माजी पंचायत समिती सदस्या यशोदा परदेशी, सदस्य किरण कुंभार, किशोर भगत, सदस्य सविता केनी, उमेश भोईर, हितेन घरत, आनंद ठाकूर, व्हाईस चेअरमन सुनील नारंगीकर, सर्व संचालक ,सभासद कर्मचारी ,पिग्मी एजंट व गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली