सोलापुर रेल्वे स्थानकावर मालगाडी थांबल्यावर त्यावरती चढून सेल्फी घेताना एका मुलाला विजेचा धक्का बसला आहे. सेल्फी काढणे त्याला खूपच महागात पडले आहे.
शासकीय रुग्णालयात त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. मुक्सीद जमादार असे जखमी मुलाचे नाव आहे. हा प्रकार रविवारी सायंकाळी साडेपाच सुमाराला घडला आहे.
मुक्सीद जमादार हा सोलापुर स्थानकावर आला होता. प्लॅटफॉर्मनंबर पाचच्या बाजूला मालगाडी थांबली होती. डब्यावर चढून सेल्फी घेताना त्याला हाय व्होल्टेज वायरचा धक्का बसला. जोरात आवाज आला. स्थानकावरील पोलीस पथक घटनास्थळी धाव घेऊन मुलाला उपचाराला दाखल केले आहे.